वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने जळून खाक..

वाशीममध्ये रविवारी पहाटे चार दुकानांना भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. घटनेचा व्हिडिओ समोर आला..

महाराष्ट्रातील वाशिम येथे रविवारी (दि.२६) पहाटे भीषण आग लागून चार दुकाने जळून खाक झाली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चारही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसत आहे. आगीमुळे धुराचे मोठे लोट आकाशात पसरले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी संयुक्तपणे आग विझविण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाने क्रेनच्या मदतीने दुकानांचे शटर उघडून आतून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

39
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.