स्मार्ट मीटर ग्राहकांवर जुलूम..

सध्या स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलाचे प्रकरण खूप चिघळले आहे. मात्र भांडवलदार आणि अंबानी, अदानीचे तळवे चालणारे सरकार सर्वसामान्यांना फाट्यावर मारीत आहे. आज शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी चार तास झाले तरी आमची लाईट आली नाही. आमच्याकडे इन्व्हर्टर असल्याने लाईट गेल्याचे कळले नाही. जेव्हा लक्षात आले तेव्हा महावितरणच्या कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, तुमची वीज कापली आहे. का तर तुमचा चेक क्लिअर व्हायला नियोजित तारखेच्या एक दिवस ज्यास्त झाला.. इथे प्रश्न असा पडतो की, आमच्या डोंबिवलीत कितीतरी गाववाले एम एस इ बी वाल्यांना ठोकून अथवा चिरीमिरी देऊन पूर्ण बिले कधीच भरीत नाहीत. आणि सर्वसामान्यांचे बिल एक दिवस उशिरा भरले गेले तर त्यांची लाईट लगेच कापली जाते.. अदानी चे कामगार बिल काढायला आणि मीटर रिडींगला असल्याने सर्वच गोंधळ उडालेला आहे.. हा सर्व अन्याय गोरगरिबांवर होतो आहे. आमची लाईट गेली असल्याने या महिन्यात जे 31 तारखेला बिल भरायचे होते ते आम्ही आजच भरल्याने व मी या लोकांना चांगला बोनस दिल्याने तासाभरात आमची लाईट आली. मी स्वतः पत्रकार असूनही इतका मनस्ताप होतोय तर सर्वसामान्यांना हे लोक किती त्रास देत असतील याची कल्पना करा.. दोष एम एस इ बी वाल्यांचा नाही दोष आहे तो या नालायक सरकारचा.. सगळ्याच पातळ्यांवर अपयशी ठरून सुद्धा हे लोक निर्लज्जपणे आम्ही किती चांगले राज्य चालवीत आहोत असे सांगतात तेव्हा यांना चपलेने सडकून काढावे असे वाटते.. तुम्हा कुणावर असा कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला असेल अथवा होत असेल तर आपण आमच्या शब्द खड्ग वृत्तपत्राला कळवा. आम्ही आपल्याला आपली बातमी छापून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

77
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.