मेहनती माणसाने आतातरी व्यवसायाकडे वळावे.. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यासाठी मदत करीत आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत आपटे साहेब, श्रीकांत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उद्योग विभाग अध्यक्ष अश्विन केळकर. मुंबई उद्योग विभाग सचिव प्रा. दिपक जाधव, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष शाम चौगले, ठाणे शहर सचिव सचिन फुले, ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे, कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष व्यंकटेश नायडू ही टीम खूप मेहनत घेत आहे.. 

कटू आहे पण सत्य आहे.. मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही असे म्हणत राहिला.. आम्हाला इथे मुळीच प्रांतवाद करायचा नाही मात्र,  परराज्यातील लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन मेहनत करून लाखोपती, करोडपती झाले.. मराठी माणसाच्या मनात व्यवसायासासाठी नेहमीच शंका, कुशंका, किंतु- परंतु आणि छोट्या धंद्याची लाज वाटत असल्याने आपण १०/१५ हजाराच्या नोकरीत स्वतःला फार सुखी समजू लागलो. स्वप्न मोठी पहावीत त्यासाठी मेहनत करावी हे जरी एकशेदहा टक्के सत्य असले तरी हल्ली प्रत्येकालाच मनाप्रमाणे नोकरी मिळतेच असे नाही. नोकरीच्या दहा बारा हजारांत टाचा घासत बसण्यापेक्षा मराठी माणसाचे परराज्यातील लोकांप्रमाणे आता व्यवसायाकडे वळायलाच हवे.. इतर लोक आपल्याकडे येऊन मेहनत करून आणि गोड  बोलून पैसे कमवितात व आपण बारा पंधरा हजारांच्या नोकरीत महिन्याच्या खर्चाचा मेळ बसविण्यात दबावात राहतो.. 

मराठी माणसाने आता चिकाटी, जिद्द , मेहनत, आणि लाज उंबऱ्याबाहेर सोडून व्यवसायात उतरावे. कुठलाच व्यवसाय छोटा अथवा मोठा नसतो. होतं  काय की आपल्या बहुतांश मराठी माणसांना इगो खूप असतो आणि या इगोनेच आपण बुडू लागलो आहोत.. जर सर्वच छोट्या मोठ्या व्यवसायांत मराठी माणूस घुसला तर इतर मराठी माणसांनी त्याची टांग न खेचता त्याला सहकार्य करणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो आज काळ बदलतो आहे. शहरांमध्ये गर्दीत, प्रदूषणात कुत्र्या -मांजरा प्रमाणे राहण्यापेक्षा ज्या लोकांना गावाकडे बऱ्यापैकी काही आहे त्यांनी तिकडेच तेथील लोकांची गरज पाहून व्यवसाय सुरु करावेत.. आणि शहरातील मराठी माणसाने इथल्या गरज लक्षात घेऊन व्यवसायात उतरावे. याकामी आर्थिक मदत करणाऱ्या आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाकडे अनेक सरकारी योजना आहेत. पण, आपल्याला तिकडे वळायचेच नसल्याने आपण या गोष्टींची चौकशीच करीत नाही.. अजूनही वेळ गेलेली नाही आणि म्हणून मेहनत करण्याऱ्या आणि व्यवसायाला न लाजणाऱ्या माणसांनो जागे व्हा.. आणि मनासारखी नोकरी मिळतच नसेल तर नक्कीच व्यवसायाकडे वळा.. राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्योग विभाग यासाठी मदत आणि मार्गदर्शन करीत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : अश्विन केळकर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभाग अध्यक्ष या मोबाईल ( 9833836242 ) क्रमांकावर संपर्क साधावा.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

278
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.