सर्वात आधी आपण SIR काय आहे? ते समजून घेऊयात..
Special Intensive Revision म्हणजेच SIR.. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मतदार यादी दुरुस्ती करणे. पण याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डिप्लिकेट मतदार वगळ्यात येतात आणि नवीन मतदार यादीमध्ये ॲड केले जाते.
अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान बीएलओ (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात.
या प्रक्रियेत नक्की काय होते?
बीएलओ स्वतः घरी येऊन तुम्ही तिथेच राहता की नाही, याची खात्री करतात.
काही बदल करायचा असल्यास आवश्यक फॉर्म भरून घेतात.
मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळली जातात.
18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातात.
2002 च्या SIR लिस्टमध्ये नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?
यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे, किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे.
त्यानंतर लॉगिन करून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील.
1. Search your name in SIR यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून तुमचं नाव या यादीत आहे की नाही ते चेक करायचं आहे.
2. आणि दुसरं ऑप्शन आहे Last SIR E-Roll यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला VIEW यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर लिस्ट आली असेल. त्यात तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा. जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव ॲड करावं लागेल.
त्यासाठी तुम्हाला तुमचं मतदारकार्ड, आधारकार्ड आणि तुमच्या पालकांचं नाव 2002 च्या SIR यादीत असणं बंधनकारक आहे.
बीएलओ (BLO) पडताळणीसाठी तुमच्या घरी आले आणि त्यांना असे आढळले की तुम्ही त्या पत्त्यावर आता राहत नाही (स्थलांतरित झाले आहात) किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तरच नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.
सध्या SIR ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक भागामध्ये SIR सर्वे केला जात आहे. यासोबत ज्यांची नाव SIR मध्ये नसतील त्यांचे नाव मतदार यादीत वगळ्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे.
जनसामान्यांना यासंदर्भात विचारले असता भाजप सरकार नेहमीच असे काही ना काही पिल्लू सोडून जनतेला वेठीस धरीत असल्याच्या भावना लोकांनी बोलून दाखविल्या. तर काही लोकांच्या मते बंगाल मध्ये मुद्दाम भाजप विरोधी लोकांचा मतदानाचा हक्क काढून घेतला व ममता बॅनर्जी यांचा टेक्निकल पराभव केला. त्याच बरोबर या मतदानाच्या साडेचार हजार ईव्हीएम मशीन जाळून टाकल्या असा ही भाजप वर आरोप आहे. मात्र, इतके होऊन सुद्धा लोक या लहरी महम्मद सरकार विरोधी आवाज का उठवीत नाही असेही काही लोकांनी सांगितले..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.