मुंबई, ठाणेमध्ये आजही शाळा बंद.. राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी..

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, कोकण तसेच पुणे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे..

राज्यभरात सोमवारी दिवसभरात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये १३ ठार झाले, तर ४ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, बुधवार, ८ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत महिन्याभराच्या सरासरीचा पाऊस केवळ चार दिवसांत झाला आहे. तर वैतरणा नदी धोक्याच्या पातळीवर असून नदी काठावरील गावांमध्ये या नदीच्या पुराचे पाणी घुसले. जिल्हा प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना रस्ते मार्गे काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे व पालघरमधील शाळांना मंगळवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

42

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.