मुंबई : देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आणि भाबडे नक्कीच आहोत, पण मूर्ख नाही. आपल्या याच हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी राम मंदिर लुटत असेल, 'आपण कट्टर, तर आता हिंदू त्यांना माफ करणार नाही,' असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. यावेळी त्यांनी भाजप, पंतप्रधान आणि अयोध्येतील महंतांवर सडकून टीका केली..
रविवारी दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात (पुरातन वटवृक्ष मंदिर) ठाकरे गटाच्या वतीने 'रामरक्षा आंदोलना'ची हाक देण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे बोलत होते. या ठिकाणी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाच्या पठणासह महाआरती करून या राज्यव्यापी आंदोलनाचा शंखनाद केला. भरपावसात शिवसैनिक या आंदोलनासाठी उपस्थित राहिले.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद पदाधिकारी उपस्थित होते. या सावंत यांच्यासह मुंबईभरातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेकडो शिवसैनिक आणि काही साधू-महंतही आले होते.
शेवटी उद्धवजींना आठवला राम : फडणवीसांचा पलटवार
ठाकरे गटा गटाच्या या 'रामरक्षा आंदोलना'वर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, 'मला आनंद आहे की शेवटी उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली आहे. त्यांनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. मात्र, जर ते (उद्धव ठाकरे) राममार्गाने चालले तर त्यांचे भले होईल. फक्त आजच्या दिवसांपुरती नाही, तर त्यांनी दररोज रामरक्षा म्हणावी अशी माझी अपेक्षा आहे.'
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.