मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस.. आज 'ऑरेंज अलर्ट'; शाळा-कॉलेज बंद..

शनिवार सकाळपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी कायम होता. मुंबईसह राज्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी अशा अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले..

मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. गोरेगाव आरे कॉलनीत दुचाकीस्वाराच्या अंगावर फांदी पडल्याने १८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. कुर्ला कमानी येथे दुकानदाराच्या अंगावर झाड पडल्याने युनूस कुडावाला यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याआधी चेंबूर येथे झाडाने विहानचा तर साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रविवारी चौथा बळी गेला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केले असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी मुंबईकरांना केले आहे.

60

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.