मुंबईत ३६ हजार मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन.. दिवाळीत ४४३ मेट्रिक टन अतिरिक्त कचरा..

मुंबईकर दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करत असताना मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी मात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत होते..

मुंबई : दिवाळीच्या पाच दिवसांत मुंबईत नेहमीच्या तुलनेत ४४३ मेट्रिक टन अतिरिक्त कचरा जमा झाला. ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत पालिकेने एकूण ३६,४४५.०६ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करून त्याची वाहतूक केली. यासाठी ६७८७ वाहनफेऱ्या करण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये मुंबईत दररोज सरासरी ७२००.४० मेट्रिक टन कचरा संकलित होत होता. या सरासरीनुसार दिवाळीच्या पाच दिवसांत सुमारे ३६००२ मेट्रिक टन कचरा जमा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा सुमारे ४४३ मेट्रिक टन अधिक कचरा जमा झाला. दिवाळीच्या काळात फटाक्यांचा कचरा, भेटवस्तूंचे खोके, पॅकेजिंग साहित्य आणि इतर उत्सवकालीन कचऱ्यात वाढ झाल्याचे दिसून आले.

दिवाळीच्या काळात ७ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक कचरा जमा झाला. या एका दिवसात ७८१०.२६ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. त्यासाठी १३९९ वाहनफेऱ्या मारण्यात आल्या. नेहमीच्या दैनंदिन सरासरीच्या तुलनेत या दिवशी सुमारे ६१० मेट्रिक टन अधिक कचरा जमा झाला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्ते, बाजारपेठा, निवासी परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा तातडीने हटविण्यासाठी पालिकेने विशेष व्यवस्था केली होती. रस्ते सफाई, घरोघरी कचरा संकलन तसेच कचऱ्याची वाहतूक या सेवा संपूर्ण उत्सवकाळात सुरू ठेवण्यात आल्या. सफाई कामगार, वाहनचालक, मदतनीस आणि पर्यवेक्षकांनी सुट्टीच्या काळातही आपले कर्तव्य बजावले.

दरम्यान, सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, कचऱ्याचे वर्गीकरण करावे आणि तो अधिकृत कचरा संकलन कर्मचाऱ्यांकडेच द्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना केले आहे.

नेहमीपेक्षा अधिक कचरा

यंदाच्या दिवाळीच्या सणात फटाक्यांचा कचरा, गिफ्ट बाॅक्सचा कचरा, पॅकेजिंग साहित्य आदी वाढला आहे. शहरात ६१० मेट्रिक टन अधिक कचरा निर्माण झाला. हा कचरा उचलण्यासाठी मुंबई मनपा पालिका कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागले आहे.

42

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.