देवेंद्र फडणवीस-तटकरे भेट.. राज्यात नवी समीकरणे.. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात..

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असतानाच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी साडेबारा वाजता ही भेट झाली. दिवाळीच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे..

मुंबई: राष्ट्रवादीचे विलीनीकरण आमच्या शिवाय शक्य नाही असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीकडे राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. तटकरे यांनी काल, मंगळवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली होती.

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीही वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केल्याचे मुंडे यांनी सांगितले.

अजित पवार गटाचे आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत - संजय राऊत

मुंबई: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत मला काहीच माहिती नाही. पण, अजित पवारांसारखे नेतृत्व राहिले नाही. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा उबाठा नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला. गोकुळची कालची निवडणूक आपल्याला मान्य नाही. सतेज पाटील यांचं पॅनल जिंकलेलं असताना तुम्ही विजय ओरबाडून घेतला. इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस होता, असा आरोप राऊत यांनी केला.

योग्य वेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील - सुनेत्रा पवार

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी बुधवारी थेट उत्तर देणे टाळले. ‘योग्य वेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असे सूचक विधान त्यांनी केले.

31

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.