मुंबई महापालिकेत नर्सेस भरतीचा मार्ग मोकळा; केईएम, नायर, सायनसह सर्वसाधारण रुग्णालयात रिक्त जागा भरणार..

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांचे बळकटीकरण केले जात असताना आता रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. केईएम, नायर, सायन कूपर रुग्णालयासह १६ सर्वसाधारण रूग्णालयात ही परिचारीकांची भरती करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव लवकरच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे..

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, केंद्रांमध्ये परिचारिकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. तीन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर आता नर्सेसच्या कायमस्वरूपी भरतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे सेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले. दरम्यान, रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया पूर्ण करून आयुक्तांच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

भरतीसाठी पाठपुरावा

केईएम, नायर, सायन आणि कूपर या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांसह महापालिकेच्या अन्य १६ रुग्णालयांमध्ये, आरोग्य केंद्रांमध्ये आणि प्रसूतिगृहांमध्ये परिचारिकांची पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाअभावी सध्या कार्यरत परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असून, त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून कायमस्वरूपी नर्सेस भरतीसाठी पाठपुरावा सुरू होता. महापालिका सभागृहात वारंवार प्रश्न उपस्थित करून जाब विचारण्यात आला होता.

34

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.