कसारा येथे दोन दिवस विशेष ब्लॉक; मध्यरात्री खर्डी-कसारा दरम्यान लोकलसेवा बंद, मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका..

आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासह कसारा यार्डातील इगतपुरीच्या दिशेकडील अप मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून १३ आणि १४ नोव्हेंबरच्या रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामासाठी नॉन-इंटरलॉकिंग आणि पॉवर ब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे..

मुंबई :  १३ आणि १४ नोव्हेंबरच्या दोन्ही रात्री ब्लॉक कलावधीत कसारा आणि खर्डी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाही. तसेच काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.

शुक्रवार १३ आणि शनिवार १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.१० ते १.४० या वेळेत अप मुख्य मार्गिका आणि तिसऱ्या मार्गिकेवर खर्डी-कसारा दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कसारा दिशेने जाणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्या कसारा स्थानकात २० ते २५ मिनिटे थांबवण्यात येणार आहेत. १३/१४ नोव्हेंबरच्या रात्री एलटीटी-सुबेदारगंज अमृत भारत एक्स्प्रेस आणि एलटीटी-भुवनेश्वर एक्स्प्रेसला विलंब होईल. तर दोन्ही रात्री सीएसएमटी-हावडा, एलटीटी-बनारस, सीएसएमटी-गोरखपूर विशेष आणि एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

ब्लॉकदरम्यान खर्डी-कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहील. ब्लॉकपूर्वी कसाऱ्यासाठी सीएसएमटीहून सुटणारी शेवटची लोकल रात्री ८.४४ वाजता धावेल. तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल रात्री ११.०५ वाजता सीएसएमटीहून सुटेल. मात्र, ब्लॉकचे काम पूर्ण होईपर्यंत ही लोकल खर्डी स्थानकात थांबवण्यात येईल. तसेच सीएसएमटीच्या दिशेने जाणारी कसारा येथून सुटणारी शेवटची लोकल रात्री १० वाजता रवाना होईल. तर ब्लॉकनंतरची पहिली लोकल पहाटे ३.५१ वाजता कसारा येथून सुटेल. याशिवाय, सीएसएमटीहून रात्री ९.३२ वाजल्यापासून सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंतच धावतील.

66

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.