व्यावसायिक एलपीजी गॅस १८३ रुपयांनी कमी..

देशभरातील तेल कंपन्यांनी १ जुलै २०२६ पासून सर्वसामान्यांना आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. बुधवारपासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे १८३ रुपयांची, तर ५ किलोच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलेंडरच्या दरात सुमारे १३ रुपयांची कपात करण्यात आली आहे..

यासोबतच, देशांतर्गत विमान सेवांसाठी लागणाऱ्या 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल'च्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची कपात करून ते ११० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांशिवाय, देशात ७ हजारांहून अधिक पेट्रोल पंप चालवणाऱ्या खाजगी तेल कंपनी 'नयारा एनर्जी'ने देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. 

एलपीजी सिलेंडरचे नवे दर (प्रमुख शहरे):

दिल्ली: १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८३.५ रुपयांची कपात झाली असून, आता तो २,९३० रुपये झाला आहे.

मुंबई: १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८२ रुपयांची कपात झाली असून, आता तो २,८८५ रुपये झाला आहे.

५ किलो फ्री ट्रेड एलपीजी: ५ किलोच्या छोट्या सिलेंडरच्या रिफिलचा दर आता ८०८.५ रुपये झाला आहे.

37

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.