स्पर्धा परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जंतरमंतर येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषण सुरू होताच दिल्ली पोलिसांनी
या ठिकाणचे पाणी आणि स्वच्छता सुविधा शौचालय बंद केल्याचा आरोप ‘कॉकरोच जनता पार्टी’ने केला आहे..
‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी रविवारी ‘X’ वर पोस्ट करत प्रशासनावर निशाणा साधला. ‘सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू करताच दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील स्वच्छता सुविधा बंद केल्या आहेत.
तिथे ना पाण्याची सोय आहे, ना स्वच्छतेची. वांगचुक यांचे वय आणि प्रकृती पाहता पोलिसांनी सहकार्य करावे अशी विनंती आम्ही वारंवार केली, पण पोलीस ऐकत नाहीत. इतर मूलभूत सुविधाही बंद केल्या जातील अशी आम्हाला भीती आहे. पोलिसांना नक्की काय करायचे आहे?’, असा सवाल अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘नीट’ पेपर लीक आणि स्पर्धा परीक्षांमधील इतर घोळांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘सीजेपी’ गेल्या २० जूनपासून जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.