युरोप मध्ये उष्णतेने नागरिक हैराण.. इतिहासात पहिल्यांदाच इतकी उष्णता..

युरोपसारख्या थंड प्रदेशात उष्णतेची लाट पसरली आहे. स्कॅन्डिनेव्हियन भागातील डेन्मार्कमध्ये ३६.४ अंश या आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद केली आहे. जर्मनीत उष्णतेमुळे महामार्गांचे नुकसान झाल्याच्या आणि रेल्वेगाड्या रद्द केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत..

लंडन : युरोपसारख्या थंड प्रदेशात उष्णतेची लाट पसरली आहे. स्कॅन्डिनेव्हियन भागातील डेन्मार्कमध्ये ३६.४ अंश या आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद केली आहे. जर्मनीत उष्णतेमुळे महामार्गांचे नुकसान झाल्याच्या आणि रेल्वेगाड्या रद्द केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जर्मनीत तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

युरोपमधील बहुतेक देशांमध्ये थंड हवामान असल्याने त्यांना अशा तीव्र उष्णतेची सवय नाही. जर्मनीचे प्रसिद्ध 'ऑटोबान' महामार्गही या उष्णतेपुढे हतबल झाले आहेत. बर्लिनच्या बाहेर दोन ठिकाणी भीषण उष्णतेमुळे 'ए२' महामार्गाचे काँक्रीट उखडले.

फ्रान्समध्ये उष्णतेची लाट काही भागांत ओसरायला सुरुवात झाली असली, तरी रुग्णालयांवर मात्र मोठा ताण कायम आहे. हृदयविकाराचा झटका आणि उष्णतेमुळे होणारे मृत्यू आदी आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना रुग्णालय करत आहेत.

44

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.