एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विश्वास वाढत चालल्याने या लोकांचा शिंदे सेनेत जाहीर प्रवेश होताना दिसत आहे..
मुंबई, नांदेड, सोलापूर, पालघर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रेवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी या सर्व लोकांचे स्वागत केले. शिंदे म्हटले की या लोकांनी आमच्या शिवसेनेवर दाखविलेल्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू.
ठाकरे गटाचे वरळीतील शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी, मीना पाथरे, रजनी कोळी, प्रतिभा दळवी, नांदेड येथील रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, सोलापूर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि अखिल भारतीय कैकाडी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश हासपुरे, पालघर जिल्ह्यातील ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागप्रमुख प्रवीण गवळी इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश घेतला आहे.
राज्यातील ठाणे, पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यांसह विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते लोकांचा शिंदे सेनेत रोज प्रवेश होत असल्याने आपण या जिल्ह्यातील विकास कामांना गती देऊ असे शिंदे यांनी सांगितले व पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.