तरुणाची अटल सेतूवरून आत्महत्या; उलवे पोलिसांकडून शोधमोहीम सुरू..

अटल सेतूवरून समुद्रात उडी मारून पुण्यातील एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री घडली..

उलवे पोलीस आणि सागरी सुरक्षा यंत्रणांकडून व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

अटल सेतूवरून उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव प्रतीक सुभाष रासकर असे असून तो पुण्यातील शिरुर, रांजणगाव येथील खेडकर वस्तीत राहणारा आहे. प्रतीक व्यवसायाने शेअर मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ७ जून रोजी पहाटे प्रतीकने आपली कार उभी केल्यानंतर त्याने समुद्रात उडी मारल्याचे उघडकीस आले आहे.

आईला आपण बाहेर जेवण करण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून आपली कार घेऊन प्रतीक निघाला होता. तेथून त्याने थेट अटल सेतू गाठून समुद्रात उडी टाकली. या घटनेची माहिती मिळताच उलवे पोलिसांसह सागरी सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्याला सुरुवात केली.

55

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.