वायू प्रदूषण रोखण्यासह धुळ मुक्त मुंबई यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे..
मुंबई : वायू प्रदूषण रोखण्यासह धुळ मुक्त मुंबई यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, दुभाजक आणि धूळ साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार असून या मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागाला १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईतील प्रमुख वाहतूक मार्गांसह धूळप्रवण रस्त्यांची स्वच्छता करून हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), बीकेसी कनेक्टर, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह इतर महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.