मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या दररोज उशिराने धावत असल्याने मुंबईतील प्रवासी त्रस्त झाले आहेत..

गेल्या १५ दिवसांपासून लोकल गाड्या वारंवार उशिराने धावत असून, काही गाड्या तर ३० ते ४० मिनिटे उशिरा पोहोचत आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण येथून कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे की, या विलंबामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचावे लागत आहे. त्रस्त प्रवाशांनी दादर स्थानकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, या विलंबाचे कारण विचारले आणि गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याची मागणी केली..

या संदर्भात शब्द खड्गने काही प्रवाशांसोबत संपर्क साधला असता फक्त पुरुष डब्यातच नाही तर महिला डब्यात सुद्धा श्वास कोंडतो इतकी गर्दी असते. लोकल दोन तीन मिनिट जरी उशिरा अली तरी फलाटावर डबल गर्दी होते.. आणि कामावर पोहोचायला उशीर झाल्यावर बॉस ची बोलणी खावी लागतात.. कधीकधी लेटमार्क सुद्धा होतो.. दुरून येणाऱ्या प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवून जमणार नाही तर गाड्या वेळेवर धावणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सरकते जिने प्रत्येक फलाटाला जोडलेले असावेत जेणेकरून आजारी, वृद्ध आणि अपंग प्रवाशांची सोय होईल अशी मागणी सुद्धा अनेक प्रवाशांनी  केली आहे.. 

मुंबई वरून जरी प्रचंड ग्लॅमर वाटत असली तरी इथे जगणे म्हणावे तितके सोपे नाही.. गर्दी मुळे आणि वेळच्या वेळी ऑफिसला पोहोचता यावे म्हणून लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करणारे कितीतरी प्रवासी खाली पडून मृत्यू पावले आहेत किंवा कायमचे अपंग झालेले आहेत. यात महिला प्रवासी सुद्धा आहेत बरे.. याला जबाबदार कोण ? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे.. 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

43

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.