नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले..

मुंबई : नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव परिसरात शनिवारी (दि. १२) सायंकाळी अचानक आलेल्या पावसात गणेशमूर्तीवर प्लास्टिक टाकत असताना ट्रॉली उलटली आणि गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली. या दुर्घटनेत मूर्तीखाली चार ते पाच गणेशभक्त अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत त्यांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली..

पावसात मूर्तीवर प्लास्टिक टाकताना दुर्घटना

नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव परिसरात शनिवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेशमूर्ती कार्यशाळेतून मंडळाच्या ठिकाणी घेऊन जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली.

पावसापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी काही गणेशभक्त मूर्तीला प्लास्टिकने झाकट कव्हर टाकत होते. याचदरम्यान मूर्ती ठेवलेली ट्रॉली असंतुलित झाली. त्यामुळे मूर्ती एका बाजूला झुकली आणि अचानक खाली कोसळली.

मूर्तीखाली भाविक अडकले

मूर्ती कोसळल्यानंतर चार ते पाच गणेशभक्त मूर्तीखाली अडकल्याचे समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मूर्तीखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी नागरिक मदत करताना दिसत आहेत.

नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

57

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.