मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा..

मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाचे थर्ड पार्टी ऑडिट करत स्ट्रक्चरल स्टॅबेलिटी (बांधकाम स्थिरतेचे प्रमाणपत्र) रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असणार आहे तसेच मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे..

मुंबई : मुंबईत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मंडपाची उंची नियमाप्रमाणे असणे गरजेचे आहे तसेच मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाचे थर्ड पार्टी ऑडिट करत स्ट्रक्चरल स्टॅबेलिटी (बांधकाम स्थिरतेचे प्रमाणपत्र) रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असणार आहे तसेच मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.

दोन दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असून गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भक्त मुंबईत येत असतात. दरम्यान, मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर भर दिला जात असताना मंडपात खड्डा आढळल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.

49

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.