घाणेरडं किचन, किटकांची भुणभुण… मुंडेंनी केली हॉटेलचे परवाने निलंबनाची कारवाई..
मुंबई : तुकाराम मुंढे यांनी FDA च्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक ठिकाणी धाडी टाकून विविध हॉटेल्सवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अशातच आता मुंबईतही अन्न आणि औषध विभागाने धडक कारवाई केली आहे.
मुंबईतील नामांकित हॉटेलचे परवाने रद्द :
समोर आलेल्या माहितीनुसार, शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या हॉटेल्सनी स्वच्छता, अन्नसुरक्षा व परवाना नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता, कीटकांचा वावर आढळून आला, तसेच पिण्याच्या पाण्याबाबतचे नियमही या हॉटेल्सनी पाळले नसल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.