उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला..
मुंबई : नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही, अशी टीका करत एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्यात सरकारला कमीपणा वाटतो? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिथे एखाद्या सक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.