चर्चगेट मेट्रो स्थानकातील लिफ्ट अचानक बंद; ६ प्रवासी अडकले मेट्रो प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली..

तांत्रिक बिघाडामुळे काचेची लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्येच अडकली. त्यावेळी लिफ्टमध्ये सहा प्रवासी होते..

मुंबई : मुंबई मेट्रो ३च्या ॲक्वा लाईनवरील चर्चगेट मेट्रो स्थानकात मंगळवारी (दि. २५) दुपारी सुमारे १.४५ वाजता लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सहा प्रवासी दोन मजल्यांच्या मध्ये अडकले. लिफ्ट क्रमांक ५ अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मेट्रो प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) स्पष्ट केले.

दोन मजल्यांच्या मध्ये अडकले प्रवासी

माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे काचेची लिफ्ट दोन मजल्यांच्या मध्येच अडकली. त्यावेळी लिफ्टमध्ये सहा प्रवासी होते. त्यामुळे काही काळ स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचा फोटोही समोर आला असून, त्यात लिफ्टमध्ये अडकलेले प्रवासी दिसत आहेत.

मोठी दुर्घटना टळली

या घटनेमुळे ॲक्वा लाईनच्या स्थानकात काही काळ प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, मेट्रो प्रशासनाच्या तत्पर प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

चर्चगेट हे मुंबई मेट्रो मार्गिका ३ अर्थात ॲक्वा लाईनवरील महत्त्वाचे स्थानक आहे. दक्षिण मुंबईतील प्रमुख भागांना शहराच्या उत्तरेकडील उपनगरांशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा दररोज मोठ्या संख्येने नागरिक वापर करतात. त्यामुळे मेट्रो स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अडकण्याच्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

53

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.