मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे सेना, मनसे आणि काँग्रेसचा एल्गार..

ठाकरेंची शिवसेना आणि मनसे काढणार स्वतंत्र मोर्चे.. 

ज्ञानेशकुमार यांचे कृत्य लोकशाहीची हत्या करणारे असून त्यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे सोमवारी २८ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मनसे शिवसेनेतर्फे संयुक्त असा भव्य 'जनमोर्चा' काढण्यात येणार आहे.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ठरलेल्या 'एसआयआर' प्रक्रियेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवरून देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. ज्ञानेशकुमार यांचे कृत्य लोकशाहीची हत्या करणारे असून त्यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे सोमवारी २८ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने मतदारांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मनसे शिवसेनेतर्फे संयुक्त असा भव्य 'जनमोर्चा' काढण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे अधिकृत घोषणा केली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या संयुक्त स्वाक्षरीने हे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार व सत्तेतील भाजपा सरकारला मदत करणाऱ्या कामाबद्दल जनतेच्या मनामध्ये तिव्र रोष आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ रोजी ४७ लाख मतदार वाढवले होते, या ४७ लाखांचा ठावठिकाणाही लागत नाही. बिहार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही लाखो मतदार वगळले होते, असा दावाही करण्यात आला आहे.

'वोट चोरी'विरोधात राहुल गांधींचा आवाज

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी 'वोट चोरी' संदर्भात आवाज उठविलेला आहे यावर आता शिकामोर्तबच झाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय जनता पक्षाला फायदा होण्याच्या दृष्टीने व एकतर्फी पध्दतीने निवडणूक आयोगाचा कारभार करत आहेत. निवडणूक आयोगाच्या हुकूमशाही वृत्तीमुळे मतदार याद्यांमध्ये अनेक पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मतदारयादी मधून पात्र मतदारांचे नाव वगळणे ही बाब लोकशाहीवर घाला घालणारी आहे. 'एसआयआर' मोहिमेच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने देशभरातील तब्बल १३ कोटी मतदारांची नावे वगळली आहेत, यात महाराष्ट्रातील तब्बल ३ कोटींपेक्षा जास्त मतदार वगळले आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे.

आपल्या अधिकृत संदेशात राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर थेट बोट ठेवले आहे. 'देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण एक शाखाच आहोत, अशा लाचार पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोग वागत आहे. 'एसआयआर'च्या नावाखाली कोट्यवधी मतदारांची नावे पद्धतशीरपणे वगळून जनतेची अक्षम्य फसवणूक करण्यात आली आहे. हा लढा केवळ राजकीय अस्तित्वाचा नसून देशातील लोकशाही, निष्पक्ष निवडणूक व्यवस्था आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवण्यासाठीचा आहे असे त्यांनी अधोरेखित केले.

ठाकरेंचे संघर्षाचे रणशिंग

निवडणूक आयोगाने मतदारांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत निर्णायक संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत मनसे आणि शिवसेनेच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'जनमोर्चा' काढण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.

51

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.