पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, MPSC आंदोलनात फूट? विद्यार्थ्यांमध्येही मतभेद..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे..

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मुख्य आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने पुण्यात तीन स्वतंत्र ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून या आंदोलनांना पाठिंबा दिला जात असतानाच, आंदोलनाच्या मागण्यांवरून विद्यार्थ्यांमध्येच वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील एस. एम. जोशी पूल, हटविण्याच्या टिळक चौक आणि शास्त्री रस्ता येथे विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी १ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शास्त्री रस्त्यावर काही विद्यार्थ्यांनी स्वतंत्र आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी टिळक चौकातही विद्यार्थ्यांच्या एका गटाने स्वतंत्र आंदोलन सुरू केले.

राजकीय नेत्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील तसेच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आणि विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. आगामी एक-दोन दिवसांत आणखी राजकीय नेते आंदोलनस्थळी भेट देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

57

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.