बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुंबई डिजिहेल्थ कनेक्ट (एमडीसी) अभियान १०० दिवसांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी होणार असून २ ऑक्टोबरपासून १०० दिवसांच्या कालवधीसाठी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात राबविण्यात येणार आहे..
अभियानअंतर्गत मुंबईतील अधिकाधिक पात्र नागरिकांचे आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट (आभा) कार्ड निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच ७० हून अधिक वयोमान असलेल्या जेष्ठ नागरिकांचे आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करण्याचेही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आभा कार्डची उपलब्धतता ही अत्यंत मदतीची ठरणार आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनुषंगाने उपचारांची उपलब्धतता सहजरित्या होण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक मुंबईकरांनी या अभियानात सहभाग व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी केले आहे.
मुंबईतील मोठ्या प्रमाणात नागरिकांना आभा कार्डच्या माध्यमातून फायदा व्हावा, यादृष्टीने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या अभियानासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.