टायगर श्रॉफच्या सुरक्षेत वाढ.. मुंबई पोलीस करीत आहेत तपास.. मुंबई पोलिसांकडून बॉडीगार्ड्स तैनात..

टायगर श्रॉफच्या मनात भीती निर्माण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा हल्लेखोरांचा हेतू असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे..

मुंबईतील जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. पोलिसांच्या संरक्षण शाखेकडून बॉडीगार्ड्स तैनात करण्यात आले असून, स्थानिक पोलिसांकडूनही अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर या प्रकरणातील तीन संशयितांना सोमवारी (दि. १९) ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या हल्ल्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संबंध आहे का आणि खंडणी उकळण्याचा हेतू होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कोटा रेल्वे स्थानकावर तिघांना अटक

प्राथमिक तपासात, टायगर श्रॉफच्या मनात भीती निर्माण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा हल्लेखोरांचा हेतू असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिश्नोई टोळीच्या यापूर्वीच्या गुन्हेगारी कारवायांचा संदर्भही तपासात विचारात घेतला जात आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टायगर श्रॉफच्या कारवर कथितरीत्या गोळीबार करणाऱ्या तिघांना सोमवारी (दि. १९) सकाळी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर रेल्वेतून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत ही कारवाई केली. हे आरोपी मुंबईतून नेपाळच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असावेत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील बेगुसराय येथील ऋतिक ऊर्फ रोशन आणि हरयाणातील सोनीपत येथील रेहान यांचा समावेश आहे. कोटाच्या पोलिस अधीक्षक तेजस्वनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी कोटा स्थानकावर पोहोचली असता, रेल्वेच्या जनरल डब्यातून या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

37

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.