मुंबई : डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एडिस अळ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. पांडुरंग तोडकर (४७) हे डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी करण्यासाठी भोईवाडा बीडीडी चाळीतील एक मजली इमारतीवर गेले असता खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. भोईवाडा बीडीडी चाळीतही डेंग्यूच्या प्रजननस्थळांची तपासणी मोहीम करताना शनिवारी दुपारी २.५५ वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली..
रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू
तोडकर हे महापालिकेच्या पीसीओ विभागात कार्यरत होते. डेंग्यूच्या प्रजननस्थळांची पाहणी टेरेसवर गेले होते. पाहणी सुरू असताना ते अचानक खाली पडले. त्यांना केईएममध्ये दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.