जेन झी ने सरकारच्या झिंज्या उपटल्या - राज ठाकरे..

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे दादर शिवाजी पार्क येथे तरुणांनी केला जल्लोष.. 

ठाकरे बंधूंची आज दादरमध्ये विजयी सभा; तरुणांनी भीती घालवली - उद्धव ठाकरे..

तरुणांनी देशाला 'भीतीच्या वातावरणातून' बाहेर काढले आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना मनसे पक्षांनी आयोजित केलेली रविवारची सभा होणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली..

मुंबई : तरुणांनी देशाला 'भीतीच्या वातावरणातून' बाहेर काढले आहे. त्यामुळे देशातील तरुणांचे अभिनंदन करण्यासाठी शिवसेना मनसे पक्षांनी आयोजित केलेली रविवारची सभा होणार आहे, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखालील हे आंदोलन केवळ प्रधान यांच्या राजीनाम्यापुरते मर्यादित नव्हते.

एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले आहे. ज्यांनी तरुणांना झुरळ म्हटले होते, त्यांनी असा अहंकार बाळगू नये, असे ते पुढे म्हणाले.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जेन-झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. हा तरुणांचा मोठा विजय असून त्यात दीपके यांचा मोठा वाटा आहे.

कोणत्याही गोष्टीला मस्तवाल उत्तर देणाऱ्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढं मोठे आंदोलन देशात उभे राहिलं, त्याचा जल्लोष होणं गरजेचे आहे, त्यामुळेच शिवाजी पार्कात उद्या सर्वजण जमतील, असे ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी सांगितले की, प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवाजी पार्कवर रविवारी आयोजित केलेली सभा आता तरुणांच्या विजयाचे अभिनंदन करण्यासाठी ठरल्यानुसार पार पडेल.

74

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.