‘मोडकसागर’ही तुडुंब; सातपैकी ४ धरणे गेली ओसंडून, एकूण पाणीसाठा ७० टक्क्यांवर..

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ७.८४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे..

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांमध्ये गेल्या २४ तासांत तब्बल ७.८४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सतत बरसणाऱ्या पावसामुळे विविध धरणांतील पाणीसाठा २३ जुलै रोजी ६९.७४ टक्क्यांवर पोहोचला. तानसापाठोपाठ गुरुवारी रात्री २ वाजून ७ मिनिटांनी मोडकसागर धरण ओसंडून वाहू लागले आहे.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तर वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात १० लाख ९ हजार ४३२ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे.

धरण क्षेत्रात २४ तासांत पडलेला पाऊस (मिमी)

अप्पर वैतरणा - २३०.०० मिमी

मोडकसागर - १८५.०० मिमी

तानसा - १०३.०० मिमी

मध्य वैतरणा - २०७.०० मिमी

भातसा - १२३.०० मिमी

विहार - १०३०० मिमी

तुळशी - १६३.०० मिमी

43

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.