चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले..

चेंबूर कॉलनीतील राम मंदिर परिसरात रविवारी सकाळी धावत्या बेस्ट बसला बॅटरी बॉक्समध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली..

मुंबई : चेंबूर कॉलनीतील राम मंदिर परिसरात रविवारी सकाळी धावत्या बेस्ट बसला बॅटरी बॉक्समध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून बसमधील अग्निशमन यंत्रांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील ४० प्रवासी थोडक्यात बचावले आणि मोठा अनर्थ टळला.

देवनार एसएमटीएटीपीएलच्या आगारातील लीजवरील ए-३६४ मार्गावरील बस क्रमांक ७७५ (एमएच-०१-एफसी-५४९४) महूल गाव ते ट्रॉम्बे या मार्गावर धावत होती. बस राम मंदिराजवळ पोहोचली असता चालकाला त्याच्या आसनाखालील भागातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्याने तातडीने बस थांबवून पाहणी केली असता बॅटरी बॉक्समध्ये ठिणगी पडून शॉर्टसर्किट झाले आणि आग लागल्याचे निदर्शनास आले. चालकाने तत्काळ बसमधील तिन्ही अग्निशमन यंत्रांचा वापर वेट करून सुमारे सकाळी ८.१५ वाजता आग पूर्णपणे विझवली.

प्रवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत चालकाने आग आटोक्यात आणली होती. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बसची बॅटरी जोडणी तोडून बॅटरी बाहेर काढली. बेस्टचे तसेच संबंधित कंत्राटदाराचे मेकॅनिक घटनास्थळी दाखल झाले. बस पुढील तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी देवनार आगारात नेण्यात आली आहे.

43

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.