सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये..

दूध, भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता महागाईच्या आगीत सीएनजी दरवाढीने तेल ओतले आहे. महानगर गॅस लिमिटेडने शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे..

मुंबई : दूध, भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता महागाईच्या आगीत सीएनजी दरवाढीने तेल ओतले आहे. महानगर गॅस लिमिटेडने शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो १.५० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर सीएनजीचा नवा दर प्रति किलो ९१.५० रुपये असणार आहे. या निर्णयाचा थेट फटका रिक्षा, टॅक्सी चालक आणि खासगी सीएनजी वाहनधारकांना बसणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने दरवाढीमागील कारणे स्पष्ट करणारे निवेदन जारी केले आहे. सध्या सुरू असलेल्या पश्चिम आशियातील तणाव आणि संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर भडकले आहेत. देशांतर्गत गॅस वाटपात कपात झाल्यामुळे महागड्या आयात केलेल्या आरएलएनजी गॅसवरील अवलंबित्व वाढले आहे.

एकूण पुरवठ्यात आयात गॅसचा वाटा वाढल्याने महानगर गॅस लिमिटेडच्या खरेदी खर्चात मोठी वाढ झाली आहे. या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी आणि ग्राहकांना अखंड पुरवठा सुरू ठेवण्यासाठी ही दरवाढ करणे अपरिहार्य ठरल्याचे कंपनीने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, मुंबईपूर्वी राज्यातील पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातही सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसच्या (पीएनजी) किमतीत मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. या शहरांमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो १.२५ रुपयांनी, तर पीएनजीचे दर प्रति घनमीटर १.५० रुपयांनी वाढले आहेत.

रिक्षाचालकांवर आर्थिक बोजा

सीएनजीच्या दरात अलीकडेच प्रतिकिलो १.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी दरवाढ असून, त्यामुळे रिक्षाचालकांवरील आर्थिक बोजा आणखी वाढला आहे. गेल्या ७५ दिवसांत सीएनजीच्या दरात एकूण ५.५० रुपयांची वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीमुळे प्रतिकिमी २१ पैशांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे, असे रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष थंपी कुरियन यांनी सांगितले.

मुंबई सीएनजी दर :

एप्रिलपासून १०.५० रु./किलो वाढ

१२ एप्रिल - ₹१/किलो

१४ मे - ₹२/किलो

३० मे - ₹२/किलो

१ सप्टेंबर - ₹२/किलो

१ ऑक्टोबर - ₹१/किलो

३१ ऑक्टोबर - ₹१/किलो

१४ नोव्हेंबर - ₹१.५०/किलो

एकूण दरवाढ : ₹ १०.५०/किलो

सध्याचा दर : ३९१.५०/किलो

36

जाहिरात

ट्रेंडिंग बातम्या

Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.