'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच दिल्लीतील पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत विरोधी पक्ष आणि इतरांकडून निदर्शने करण्यात आली..
मुंबई : 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसेच दिल्लीतील पोलीस कारवाईचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत विरोधी पक्ष आणि इतरांकडून निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या आंदोलनात अटक झालेल्यांना कायदेशीर मदत देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल ९०० हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले आहे. चैत्यभूमी परिसरातील घटनेबाबत ३ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून ५० हून अधिक आंदोलकांवर कारवाई सुरू आहे.
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.