इनोव्हेट पॅथॉलॉजी लॅब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी डोंबिवली पश्चिम नेमाडे गल्ली येथे लहान मुलांसाठी विशेष रक्तगट (Blood Group) तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले..
या शिबिराला पालक व लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मुलांच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांसाठी मोफत मधुमेह (Sugar) व रक्तदाब (BP) तपासणी करण्यात आली. उपस्थितांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही पटवून देण्यात आले.
या समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन श्री अश्विन हेमंतकुमार केळकर (मुंबई विभाग अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग विभाग) यांच्या आणि उद्योग विभाग टीमच्या पुढाकाराने करण्यात आले.
यावेळी मुंबई विभाग उपाध्यक्ष श्री उदयराज सिताराम तळेकर, मुंबई विभाग सचिव प्रा. दीपक जाधव, कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष श्री व्यंकटेश नायडू, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मराठे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व डॉक्टर, इनोव्हेट पॅथॉलॉजी लॅबचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.