राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा गट ) पक्ष प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार यांनी मुंबई येथील षण्मुखानंद हॉल मध्ये कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनात पक्ष वाढवा आणि तळागाळातील कार्यकर्ते जोडा या आवाहनाला जागत डोंबिवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभागाने रविवार 14 जून 2026 रोजी डोंबिवली पश्चिमेतील नेमाडे गल्लीत राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात माधव बाग यांच्या संयुक्तविद्यमाने हृदयरोग तपासणी, रक्तदाब इत्यादी अनेक प्रकारच्या तपासण्या करण्याचे शिबीर यशस्वी रित्या राबविले. या शिबिराला स्थानिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला.
माधव बाग तर्फे या शिबिरात
डॉ. संध्या शृंगारपुरे (PCE)
दीपा तारपे (PKT )
डॉ. निकिता भोईर
यांनीही आरोग्य तपासणी केली..
श्रीकांत कदम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, अभिजीत आपटे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, विजया भोसले महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभले.
या शिबिराला प्रमुख उपस्थिती-
गोवर्धन भोईर- महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग, कल्याण डोंबिवली जिल्हा उपजिल्हाध्यक्ष.
शशिकांत म्हात्रे - राष्ट्रवादी युथ काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर अध्यक्ष
शरद भोईर
हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहिले..
शिबीर यशस्वीरीत्या संपन्न करण्यात सिंहाचा वाटा असलेले पदाधिकारी..
- श्री. अश्विन हेमंत कुमार केळकर
मुंबई विभाग अध्यक्ष
- प्रा. दिपक संभाजी जाधव
मुंबई विभाग सचिव
- श्री संदीप उबाळे
मध्य मुंबई अध्यक्ष
- श्री शाम नाना चौगले
ठाणे शहर अध्यक्ष
- श्री सचिन फुले
ठाणे शहर सचिव
- श्री वेंकटेश नायडू
कल्याण डोंबिवली अध्यक्ष
- श्री रवींद्र शिंदे
कार्यालय प्रमुख
या प्रसंगी अश्विन केळकर आणि प्रा. दिपक जाधव तथा उद्योग विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही राष्ट्रवादी उद्योग विभागाचे पदाधिकारी पक्ष प्रमुख आदरनीय सुनेत्रा वहिनी यांचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही व पक्ष वाढीसाठी विविध प्रकारची शिबिरे घेऊन सतत प्रयत्नशील राहू असे सांगितले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.