मुंबई, दि. 26 जून 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) आणि अष्टविनायक हेल्थ केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व ५० टक्के सवलतीत चष्मा वाटप शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले..
या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत मोफत नेत्रतपासणी करून घेतली. तसेच गरजू नागरिकांना अल्प दरात व ५० टक्के सवलतीत दर्जेदार चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना नेत्रआरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.
या प्रसंगी मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन केळकर, मुंबई विभाग सचिव प्रा. दीपक जाधव, मुंबई विभाग उपाध्यक्ष उदयराज सिताराम तळेकर, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे, पश्चिम मुंबई अध्यक्ष सुजित गुप्ता, कार्यालय प्रमुख रवींद्र शिंदे तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी समाजातील गरजू नागरिकांसाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांची गरज अधोरेखित केली आणि भविष्यातही अशा जनहिताच्या सेवा सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.