रेलचाइल्ड शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या डोंबिवली पश्चिम येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक सुनील कांबळी सरांचा गुरुवार 9 जुलै 2026 रोजी शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी सत्कार केला..
गेली अठरा वर्ष अध्यापनाचे काम करणारे कांबळी सर बीएस्सी बीएड आहेत. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत व विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिक्षक-विद्यार्थी आणि शिक्षक - पालक यांचा संवाद घडवून आणण्याचे काम मी सतत करीत राहील व विद्यार्थ्यांसाठी सतत विविध योजना राबवित राहील असे कांबळी सरांनी शब्द खड्गला सांगितले. विद्यार्थी देशाचे भविष्य असल्याने त्यांचा फक्त बौद्धिकच नाही तर शारीरिक आणि मानसिक विकास योग्यरितीने होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यावर कांबळी सरांचा भर असणार आहे. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असल्याने त्याच्या अंगच्या कलागुणांना वाव देणे यावर आपण भर देणार असल्याचे कांबळी सरांनी सांगितले. शब्द खड्ग परिवार आणि शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव यांच्यातर्फे कांबळी सरांच्या मुख्याध्यापक म्हणून सुरु झालेल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.