शिक्षकांना न्याय मिळायलाच हवा त्यांना शिक्षकेतर कामांत गुंतवू नये..
मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यातील शिक्षकांनी बीएलओ (BLO), एसआयआर (SIR) यांसारख्या अशैक्षणिक कामांना विरोध करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारलेआहे.. 30 जून पासून 29 जुलै पर्यंत म्हणजे शिक्षकांना न्याय मिळे पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे.
मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन व सामूहिक रजेची हाक दिली आहे.. शिक्षकांच्या या आंदोलनाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या:अशैक्षणिक कामांतून मुक्ती: शिक्षकांना मतदार यादी पुनरीक्षण (SIR) आणि बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) सारखी कामे सक्तीने दिली जातात, ती पूर्णपणे बंद करण्यात यावी.
टीईटी (TET) सक्तीला विरोध: पदोन्नतीसाठी टीईटी किंवा सीटीईटी (TET/CTET) परीक्षांची अट रद्द करण्यात यावी..
पदोन्नती व संचमान्यता: १५ मार्च २०२४ चे संचमान्यता धोरण रद्द करावे आणि सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पदोन्नती मिळावी..
अनुदान: अंशतः अनुदानित शाळांना १००% अनुदान लागू करावे.
आंदोलनाची सद्यस्थिती:
शाळा बंद आंदोलन: विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील शिक्षकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला..
प्रशासनाची भूमिका: आंदोलनात सहभागी होऊन शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा इशारा शिक्षण संचालकांनी दिला..
राजकीय पाठिंबा:
आमदार मनीषा कायंदे, आमदार सुधाकर अडबाले, जलसंधारण मंत्री गिरीष महाजन आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता..
शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राने या याबाबतीत अनेक पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते तथा विचारवंतांशी चर्चा केली. या सर्व लोकांच्या मतेशिक्षकांना मुक्तपणे शिकवू द्यावे त्यांना इतर शिक्षकेतर कामांत गुंतावूच नये. आता जी शिक्षकांना सरकार कामे देत आहे ती कामे बेरोजगार तरुणांना द्यावीत जेणेकरून त्या तरुणांना या कामाचे पैसे मिळतील.. आणि शाळा अनुदानित असो अथवा विना अनुदानित मात्र या शाळांतील शिक्षक व इतर कुणालाही या सरकारी कामांत धाक दाखवून गुंतवू नये असे सुद्धा अनेक पालकांनी सांगितले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.