संविधानाने सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराची अनेकांना जाणीव नसते. आपले अधिकार काय आहेत याची लोकांना जाणीव व्हावी या इराद्याने शब्द खड्ग मराठी, हिंदी, इंग्रजी डिजिटल वृत्तपत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने लवकरच डोंबिवली मध्ये पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग घेत आहोत..
या प्रशिक्षण वर्गात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल पत्रकारिता, कॅमेरा आणि पत्रकारितेतील सर्व बारकावे शिकविले जातील. 3 महिन्याच्या या कोर्स मध्ये अठरा वर्षांच्या पुढील मुले, मुली, स्त्री, पुरुषांना प्रवेश दिला जाईल. मात्र, या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना किमान मराठी लिहिता वाचता यायला हवी.. अत्यल्प शुल्कात आपण हा कोर्स घेणार आहोत आणि या तीन महिन्यांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकाऊ पत्रकाराचे प्रेसचे ओळखपत्र दिले जाईल.. त्याच प्रमाणे शिकाऊ विद्यार्थ्यांना आपल्या शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्रात लिहिण्याची संधी देत आहोत. कॅमेरा कसा फेस करायचा, बातमी कशी लिहायची आणि बातमी कशी वाचायची, मुलाखत कशी घ्यायची इत्यादी सर्व आपण या प्रशिक्षण वर्गात शिकविणार आहोत. आणि चांगल्या बातम्या वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आपल्या शब्द खड्ग youtube चॅनल ला टाकले जातील.. आम्ही आमच्यापरीने आमच्याकडे येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रकारचे प्रशिक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
विविध प्रकारच्या कॉलेजमध्ये आम्ही विनामूल्य पत्रकारितेची किमान 5 लेक्चर्स घेणार आहोत कृपया याची नोंद घ्यावी..
अधिक माहितीसाठी संपर्क :
अश्विन केळकर - 9833836424
शिवाजी जाधव - 9004494231
विलास चव्हाण - 8879994095
तरी इच्छुकांनी त्वरित वर दिलेल्या संपर्क क्रमांकांशी संपर्क साधून पत्रकारितेला प्रवेश निश्चित करावा..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.