डोंबिवली पूर्वेला असलेल्या विनोद सूर्यराव सरांच्या श्री समर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रन स्कूल या शाळेत मांडलेल्या प्रदर्शनाला आज अनेक पालकांनी भेट दिली.. या शाळेत मुलांनी बनविलेल्या दिवाळी सजावटीच्या वस्तू ज्यात विविध प्रकारचे रांगोळी कलर, आकर्षक पणत्या, अगरबत्ती, धूप, सजावटीच्या माळा, तोरणे, पेपर प्लेट, लक्ष्मीमातेची स्टिकर्स असे विविध प्रकार विक्रीसाठी मांडलेले आहेत. या वस्तू खरेदी करून आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपली मदत या विशेष मुलांना करणार आहोत.. आपल्या छोट्याशा खरेदीने या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलेल आणि म्हणूनच शाळेतील या प्रदर्शनाला आपण भेट द्या..या प्रदर्शना साठी विद्यार्थी आणि सूर्यराव सरांबरोबरच शाळेच्या शिक्षिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. फक्त दिवाळीतच नाही तर अगदी केव्हाही या वस्तू आपल्याला शाळेतून खरेदी करता येतील..
अधिक माहितीसाठी संपर्क : विनोद सूर्यराव सर संचालक तथा हेडमास्तर श्री समर्थ कृपा स्पेशल स्कूल.. 91583 46903..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.