जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कल्याण येथील SNDT महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन धुमधडाक्यात संपन्न..

भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ महिला महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन दिन संपन्न.. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव सर उपस्थित.. 

गुरुवार 15 ऑक्टोबर 2026 रोजी भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न, मिसाईलमॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ कल्याण येथील SNDT महिला महाविद्यालयात वाच प्रेरणा दिन संपन्न झाला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल घाडगे सर, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल पवार सर, वाचनालय प्रमुख डॉ. संकल्प गजबे, लेखनिक विभागाचे अशोक शिंदे सर आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींच्या सहकार्याने प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.. 

हा कार्यक्रम शब्द खड्गचे संपादक तथा लेखक- दिग्दर्शक, गीतकार-संगीतकार, समाजसेवक असलेले प्रा. दिपक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शब्द खड्गचे विशेष प्रतिनिधी व्यंकटेश नायडू सुद्धा हजर होते.. 

प्रा. दिपक जाधव यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. 

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. संकपाळ गजबे यांनी केली तर कार्यक्रमाबद्दल प्रा. डॉ. सुनिल पवार सरांनी महत्वपूर्ण माहिती दिली. पवार सरांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांच्या कार्याचा आढावा घेतला व मुलींनी सतत वाचले पाहिजे असा बहुमोल सल्ला दिला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील घाडगे सरांनी प्रा. दिपक जाधव आणि व्यंकटेश नायडू यांचा शाल, गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन सत्कार केला.. 

प्रा. दिपक जाधव यांनी आपल्या रोखठोक आणि खुमासदार शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाचाल तर वाचाल हा कानमंत्र देतांना प्रा. दिपक जाधव यांनी कलाम साहेबांनी स्वप्नांचा पाठलाग करा व स्वप्न प्रत्यक्षात उतरावा असे सांगतांना वाचन बरोबर माणसे सुद्धा वाचा असा सल्ला दिला. पवार सर, गजबे सर, घाडगे सर यांनी मुलींना जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचे सोने करण्याचा सल्ला दिला. रेग्युलर कॉलेजला या व यशस्वी व्हा. रोज किमान एक तरी वृत्तपत्र वाचा असेही दीपक सरांनी सांगितले..

प्राचार्य डॉ. घाडगे सरांनी आपण वाचतो त डोक्यात घेत नाही व प्रत्यक्षात उतरवीत नाही असे सांगतांना चालल्या गोष्टी वर्तनात आणायलाच हव्यात असा सल्ला दिला. या प्रसंगी कॉलेज तर्फे कविता वाचन करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनात मांडलेल्या ग्रंथांची माहिती देण्यात आली. डॉ. सुनिल पवार सरांनी डॉ. कलाम साहेबांच्या पुस्तकांची नवे सांगून त्यातून आपण सर्वांनी बोध घ्यायला हवा असे सांगितले. अशोक शिंदे सरांनी वाचन संस्कृती वाढायलाच हवी असे प्रतिपादन केले.

ग्रंथपाल डॉ. संकल्प गजबे यांनी आणि कॉलेजच्या त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे खूपच छान आयोजन केलं होतं त्याची तोंडभरून प्रशंसा शब्द खड्गचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संकल्प गजबे यांनी तर आभार  प्रदर्शन प्रा. मल्हारी सरांनी केले..

- शिवाजी जाधव. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

146
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.