जगातील टेक्नॉलॉजी संशोधनासाठी माणसाला स्वावलंबी करणार का? - डॉ. मिलिंद कसबे..

वज्रेश्वरी : अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालय वज्रेश्वरी आणि जे. ए. ई.चे महिला महाविद्यालय कल्याण डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने वज्रेश्वरी येथे संशोधन पद्धती: संकलन आणि लेखन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे बीजभाषण नारायणगाव महाविद्यालयातील डॉ. मिलिंद कसबे यांनी केले याप्रसंगी बोलताना कसबे म्हणाले की, माणसाने आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे आज संशोधन संविधान मूल्य वर्धक होते आहे का? किंवा जगातील टेक्नॉलॉजी संशोधनासाठी माणसाला स्वावलंबी करणार का असे प्रश्न उपस्थित करत संशोधनाचे महत्त्व विशद करत आज संशोधकाने संशोधन करताना काय काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर विवेचन केले.यावेळी  श्रीवर्धन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक खरे, व्ही एन नाईक महाविद्यालय दिंडोरी येथील प्राचार्य डॉ.राजेंद्र सांगळे, डॉ.संजय काळे डॉ. सुनिल पवार, डॉ. हिरालाल लोखंडे, डॉ.सचिन रुपनर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते..

 या  कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव कांबळे होते.अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना डॉ कांबळे म्हणाले की,

प्रश्न विचारण्याची जिज्ञासा म्हणजे संशोधनाची सुरुवात,

योग्य माहितीचे संकलन म्हणजे संशोधनाचा पाया,

आणि तर्कशुद्ध मांडणी म्हणजे संशोधनाचे सामर्थ्य.हे सर्व घडवून आणायचे असेल तर सातत्याने केले जाणारे वाचन आणि लेखन हाच त्याला मार्ग आहे असे प्रतिपादन  केले. तर संशोधनाचा आराखडा, त्याची उद्दिष्टे आणि त्याची मांडणी बाबत श्रीवर्धन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक खरे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. तर ए. आय. ज्या जगात आपण संशोधनासाठी नवीन नवीन उपलब्ध माहितीचा कसा वापर करू शकतो ते  आय. सी. टी. द्वारे डॉ. राजेंद्र सांगळे यांनी पटवून दिले. कार्यशाळेचे प्रास्ताविक आय.क्यू.ए.सी. प्रमुख व मराठी विभाग प्रमुख डॉ. कल्याणी शेजवळ यांनी केले. तर सत्रीय समारोप श्री. शामराव सावंत व डॉ हिरालाल लोखंडे यांनी केला. या कार्यशाळेसाठी वज्रेश्वरी, कल्याण, डोंबिवलीआणि विलेपार्ले महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात  उपस्थित होत्या.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.कल्याणी शेजवळ,प्रा.शामराव सावंत डॉ.सचिन सादरे, प्रा.बागुल तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

89
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.