मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच राहील असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते.. आजच्या भरकटलेल्या काही तरुण मुली आणि महिलांना संविधानाने त्यांना काय अधिकार दिले आहेत आणि बाबासाहेबांनी मांडलेले हिंदूकोडबिल काय हे या whatsapp युनिव्हर्सिटीत शिकलेल्या अर्धशिक्षित महिलांना मुलींना ठाऊक नाही..
हजारो वर्ष बहुजनांना पायाखाली ठेवलेल्या मंडळींना सर्वधर्म समभाव पाहवत नाही. हे लोक सत्तर बहात्तर वर्षात कंटाळले तर हजारो पिढ्या ज्यांनी अन्याय अत्याचार सहन केला ते किती त्रासले असतील. याचाही विचार व्हायलाच हवा..
काय आहे हे युजीसी प्रकरण आणि मनुवाद याचा आपण थोडक्यात परामर्श घेऊया..
यूजीसीने (UGC) जानेवारी २०२६ मध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीवर आधारित भेदभाव रोखण्यासाठी 'उच्च शिक्षण संस्थांमध्ये समता प्रोत्साहन नियम, २०२६' (Promotion of Equity in Higher Education Institutions Regulations, 2026) अधिसूचित केले आहेत. हे नियम रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या मातांच्या याचिकेवर आधारित असून, कॅम्पसमध्ये भेदभावाच्या तक्रारींची ३० दिवसांत चौकशी, दोषी कर्मचाऱ्यांना शिक्षा आणि समता समिती स्थापन करणे अनिवार्य करतात..
युजीसी प्रकरण (२०२६ नवीन नियम) सविस्तर माहिती:
उद्देश: विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये SC, ST, OBC, आणि EWS विद्यार्थ्यांविरुद्ध होणारा जाती-आधारित भेदभाव नष्ट करणे, तसेच सर्वांना सुरक्षित आणि समान शैक्षणिक वातावरण देणे..
पार्श्वभूमी (PIL): रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या मातांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार (PIL) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे नियम तयार करण्यात आले आहेत [७, ९].
नियम आणि शिक्षा:
समता समिती: प्रत्येक संस्थेत तक्रार निवारण समिती स्थापन करावी [७].
तक्रार प्रक्रिया: तक्रार प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करावी [६].
शिक्षा: दोषी आढळल्यास कर्मचारी किंवा प्राध्यापकांवर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते [६].
वाद आणि स्थगिती:
विरोध: काही घटकांकडून असा आरोप केला जात आहे की, हे नियम केवळ ठराविक जातींच्या बाजूने आहेत आणि त्यांचा गैरवापर होऊ शकतो, ज्यामुळे जातीय सलोखा बिघडू शकतो [८, १०].
न्यायालयीन हस्तक्षेप: या नियमांमधील काही तरतुदी अस्पष्ट असल्याने आणि त्यांच्या गैरवापराची शक्यता असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने या नवीन नियमांना प्राथमिक स्थगिती दिली आहे [१, ३].
यूजीसी म्हणजे काय?
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक वैधानिक संस्था आहे, जिची स्थापना १९५६ मध्ये झाली. हे उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखणे आणि विद्यापीठांना निधी पुरवणे यासारखी कामे करते..
मनुस्मृती..
1- नारी मग ती पुत्री, पत्नी, माता किंवा कन्या, युवा, व्रुद्धा कोणत्याही स्वरुपात असो ती कधीच स्वतंत्र रहायला नको.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-2 ते 6 पर्यंत.
2- पति पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो विकु शकतो, परंतु स्त्रीला या प्रकारचा कोणताही अधिकार नाही. कोणत्याही स्थिती मध्ये,विवाहानंतर, पत्नी सदैव पत्नीच रहात असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-45
3- संपत्ती आणि मिळकतीवर अधिकार किंवा दावा करण्याचा अधिकार नाही, शूद्रांच्या स्त्रियासुद्धा "दास" आहेत, स्त्रीला संपति ठेवण्याचा अधिकार नाही,
स्त्रीच्या संपतिचा मालक तिचा पति, पूत्र, किवा पिता असेल.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-416.
4- ढोर, गवार, शूद्र आणि नारी, हे सर्व ताडन करण्या योग्य आहेत,
म्हणजे स्त्रीयांना ढोरा सारखे मारता येऊ शकते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-8 श्लोक-299
5- असत्य ज्या प्रकारे अपवित्र असते, त्याच प्रकारे स्त्रियां सुद्धा अपवित्र असतात, शिकायचा, शिकवायचा, वेद-मंत्र म्हणायचा व उपनयन करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-66 आणि अध्याय-9श्लोक-18.
6- स्त्रियां शेवटी नरकातच जाणा-या असल्यामुळे त्यांना यज्ञ कार्य किंवा दैनिक अग्निहोत्र सुद्धा करण्याचा अधिकार नाही.
◆मनुस्मृती◆ अध्याय-11 श्लोक-36 आणि 37.
7- यज्ञ कार्य करणा-या किंवा वेद मंत्र बोलणा-या स्त्रियांच्या हातचे भोजन ब्राह्मणांनी वर्ज मानावे, स्त्रियांनी केलेले सर्व यज्ञ कार्य अशुभ असल्याने देवांना स्वीकार्य नाहीत.
◆मनुस्मृती◆ अध्याय-4 श्लोक-205 आणि 206.
8- मनुस्मृती प्रमाणे, स्त्री पुरुषांना मोहित करणारी असते
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-214.
9 - स्त्री पुरुषांना दास बनवून
पदभ्रष्ट करणारी असते.
◆मनुस्मृती◆अध्याय-2 श्लोक-214
10 - स्त्री एकांताचा दुरुपयोग करणारी असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-215
11. - स्त्री संभोगाप्रिय असते त्यासाठी ती वय किंवा कुरुपता सुद्धा बघत नसते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-114.
12- स्त्री चंचल आणि हृदयहीन, पति शी एकनिष्ठ न राहणारी असते.
◆मनुस्मृती◆ अध्याय-2 श्लोक-115.
13.- स्त्री केवळ शैया, आभुषण आणि वस्त्र यावरच प्रेम करणारी, वासनायुक्त, बेईमान,
इर्षाखोर, दुराचारी असते
◆मनुस्मृती◆ अध्याय-9 श्लोक-17.
14.- सुखी संसारासाठी स्त्रीयांसोबत कसे रहावे या साठी हा मनु सांगतो-
(1). स्त्रीयांनी जीवनभर आपल्या पतीच्या आज्ञेचे पालन करायला पाहिजे चाहिए.
◆मनुस्मृती◆ अध्याय-5 श्लोक-115.
(2). पति दुराचारी असो, इतर स्त्रीवर आसक्त असो,दुर्गुणांचे भांडार असो, नंपुसंक असो, कसाही असला तरीही स्त्री ने पतिव्रता होऊन देवा सारखी त्याची पूजाच करायला पाहिजे.
◆मनुस्मृती◆ अध्याय-5 श्लोक-154.
मनुस्मृतीत शूद्रांबद्दल अत्यंत विषम, कनिष्ठ आणि अन्यायकारक विचार मांडले आहेत. शूद्रांना ब्रह्मदेवाच्या पायापासून निर्मित मानून त्यांना सेवा (दास्यत्व) करणे हेच एकमेव कार्य सांगण्यात आले आहे। या ग्रंथात त्यांना ज्ञान, मालमत्ता आणि सन्मानाचा अधिकार नाकारून अस्पृश्यता व सामाजिक असमानता बळकट करण्यात आली आहे।
मनुस्मृतीतील शूद्रांबद्दलचे मुख्य विचार:
उत्पत्ती व स्थान: शूद्रांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या पायातून झाली आहे, त्यामुळे ते वर्णव्यवस्थेत सर्वात कनिष्ठ (चौथ्या) स्थानी आहेत।
कर्तव्य: केवळ ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य (द्विज) यांची सेवा करणे हेच शूद्रांचे मुख्य कर्तव्य आहे।
अधिकार नाकारणे: शूद्रांना वेदपठण, वेदांचे श्रवण किंवा यज्ञ करण्याचा अधिकार नाही. जर त्यांनी वेदांचा उच्चार केला तर त्यांना कठोर शिक्षा दिली जावी, अशा तरतुदी आहेत।
संपत्ती: शूद्र स्वतःची मालमत्ता बाळगू शकत नाहीत, असे मानले जाते।
सामाजिक दर्जा: शूद्रांचे आयुष्य हे दास्याचे (गुलामीचे) आहे. त्यांच्यावर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांना सन्मानजनक जीवन जगता येत नाही।
शिक्षेतील असमानता: गुन्ह्यांच्या शिक्षेतही विषमतेचे नियम आहेत, जिथे शूद्रांना कडक शिक्षा तर उच्चवर्णीयांना कमी शिक्षा दिली जावी, असा दृष्टिकोन दिसतो।
याच अन्यायकारक व विषमतेवर आधारित तरतुदींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून या विचारांचा जाहीर निषेध केला होता..
स्वतःच्या स्वार्थासाठी काही राजकीय लोक आणि मनुवादी बहुजनांना एकमेकांत लढवीत आहेत. त्यात विनाकारण मुस्लिम बांधवांना सुद्धा यात खेचत आहेत. जात आणि धर्म लोकशाहीला मारक आहे आणि यामुळे भारताची अखंडता धोक्यात येत आहे. या जगात फक्त दोनच जाती एक स्त्री आणि दुसरी पुरुष आणि म्हणूनच आपण सर्वांनी जातीयतेला मूठमाती देऊन माणुसकी आणि मानवता जोपासून ती अगदी कायम टिकवून ठेवायला हवी..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.