सत्तासंघर्ष.. मिसाईल पॉवर.. आम्हीच सर्व जगात अगदी सर्वच बाबतीत श्रेष्ठ असावे ही विचारधारा आणि अतिशहाणा ट्रम्प हे सर्व मिळून जग बुडविण्याच्या दिशेने निघालेले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
हे युद्ध लवकरात लवकर थांबायला हवे. जर असे नाही झाल्यास यात अमेरिका भारतालाही ओढून घेईल. एकतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी अगोदरच ट्रम्पच्या हातातील खेळणं झालेले असल्याचे जग रोज पाहत आहेत. मोदी म्हणजे कणखर इंदिरा गांधी नव्हे हेही अंधभक्त वगळता सगळ्या जगाला कळून चुकलेले आहे. सर्वनाश होण्या आधी हे युद्ध थांबायलाच हवे. आतापर्यंत शेकडो लोकांनी जीव गमावलेले आहे. त्यात १६० छोट्या शाळकरी मुली मारल्या गेल्याने जग हळहळत आहे. एपस्टीन फाईल प्रकरणावरून जगाचे लक्ष दुसरीकडे वाळविण्यासाठी ट्रम्पने ही युद्धाची चाल खेळली असल्याचे बाहेर उघडपणे बोलले जात आहे. युद्ध कधीच आणि कुणालाच हितावह नसते. यात मानव जात, माणुसकी आणि नैसर्गिक तथा मानव निर्मित गोष्टींचा नाश होतो. जीवनावश्यक सर्वच गोष्टींच्या किमती प्रचंड महागतात.. लोकांचा माणुसकीवरील विश्वास नष्ट होतो..
त्यात इराण जास्त पेटून उठण्याचे कारण म्हणजे अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर (मार्च २०२६ च्या सुरुवातीस) हा संघर्ष तीव्र झाला आहे. या युद्धात १० पेक्षा जास्त देश (अप्रत्यक्षपणे) सहभागी होण्याची शक्यता आहे, तर इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर प्रतिहल्ले सुरू केले आहेत. युद्धाचे परिणाम अनेक देशांना भोगावे लागत असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
युद्धपरिस्थिती आणि परिणाम:
देशांचा सहभाग: अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरोधात इराण असून, या संघर्षात संयुक्त अरब अमिराती (UAE), दुबई, बहरीन, कुवेत आणि कतार सारख्या आखाती देशांवर इराणचे हल्ले होत आहेत.
तणावपूर्ण परिस्थिती: इराणने अनेक देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, ज्यामुळे हा संघर्ष १०-११ देशांपर्यंत पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
मृत्यू आणि हानी: इराणचे सर्वोच्च नेते खामेनी मारले गेले असून, News18 Marathi नुसार इराणने अमेरिकेचे लष्करी तळ असणाऱ्या देशांमध्ये हल्ले सुरू केले आहेत. यामुळे जीवितहानी झाली असली तरी, नेमकी मृतांची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु Saam TV नुसार परिस्थिती तिसऱ्या महायुद्धासारखी गंभीर बनत आहे. मोदींनी या युद्धापासून भारताला वाचवावे असे मनापासून वाटते. कारण अमेरिका भारताला आज ना उद्या या युद्धात खेचणारच हे जवळपास स्पष्ट दिसत आहे..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.