खरे तर आज काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारची लोकांना आठवण येत आहे. आपण आपल्या शब्द खड्गच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्य लोकांशी बोलत असतो..
सध्याच्या युद्ध आणि तेल, गॅस आणि येऊ घातलेल्या एकूणच महागाई संदर्भात आपण अनेक लोकांना विचारले असता या लोकांनी इंदिरा गांधी यांची आणि त्यांच्या कणखर नैतृत्वाची आठवण काढली.. इंदिराबाईनीं आणीबाणी आणली मात्र, त्यानंतर काँग्रेसचा लोकांनी निवडणुकीत धुव्वा उडविला व जनतादलाचे राज्य आले. कारण इंदिराजी कितीही काही बोलल्या तरी त्यांना लोकशाही मानावेच लागली. मात्र, आता मोदी शेठ आणि अमित शहा यांनी देशाचे बारा वाजविल्याचे आणि लोकशाही गुंडाळून ठेवल्याचे, हुकूमशाही आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचे त्याचबरोबर मीडियाला विकत घेतल्याचे आणि विरोधीपक्षाला ईडी मध्ये गुंडाळल्याचे लोक सर्रास बोलत आहेत. रशिया आणि चीन यांनी इराणची बाजू घेतल्याने इराण त्यांना इंधन, गॅस सगळं व्यवस्थित पाठवीत आहे. मात्र, आपल्या शेठला अमेरिकेने त्यांच्या ताटाखालचे मांजर बनविल्याने भारत बॅकफूटवर आला आहे. एपस्टीन प्रकरण मागे पडावं म्हणून अमेरिकेने इराणशी युद्ध उकरून काढल्याचे लोक बोलत आहेत.. तसे पाहिल्यास इराण आणि इस्त्राईल यांच्यात गेली वीस वर्ष मारामारी सुरु आहे. आज इंदिराबाई असत्या तर त्यांनी अमेरिकेला चांगलेच ठणकावले असते. मात्र, तो दम आपल्या मीडियाने फुगवून मोठे केलेल्या शेठ मध्ये जिवंत नाही हेही लोकांनी बिनधास्त सांगितले. त्यात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुखमंत्री जे बोलतात त्याला गांभीर्याने घेऊ नका. भाववाढ झाली आणि आणि पुढे जाऊन ती आणखी होईल म्हणून लोकांनी सगळ्या गोष्टींचे स्वतःच नियोजन करायला हवे असेही लोक म्हटले. त्यात मोदी - शहा यांच्यापुढे आपल्या महाराष्ट्रातील तथाकथित नेत्यांना शून्य किंमत असल्याने त्यांनी काहीही थापा मारू नयेत. हॉटेलं, हातगाडीवरचे धंदे बंद व्हायला सुरुवात झाली आहे. युद्ध आपल्या घरात घुसले तरी आपले मोदी शेठ म्हणतात सर्व आलबेल आहे. अर्थात ही सर्वसामान्य लोकांची रोखठोक मतं आहेत..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.