प्रसंग सुखाचा असो अथवा दुःखाचा काही राजकारणी त्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. यात काही प्रामाणिक आणि समाजसेवेची आवड असलेले राजकारणातील लोक सुद्धा गव्हा बरोबर जसे किडे रगडले जातात तसे रगडले जातात. पण त्याला पर्याय नाही..
आजचं राजकारण इतकं खालच्या पातळीला गेलं आहे की इथे चांगल्या लोकांकडे सुद्धा संशयानेच पाहिलं जातं.. काही लोकांचा अपवाद वगळता या राजकारणी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सुद्धा कुत्र्यासारखा पाळलेला मीडिया (अर्थात सर्वच पत्रकार आणि न्यूज मीडियावाले भ्रष्ट आहेत असं मी म्हणतच नाही ) आणि यांचे तळवे चाटणारे स्तुतिपाठक याने देश रसातळाला चालला आहे. सबसे तेजच्या नादात आणि यांना पैसे पुरविणाऱ्या नेत्यांना चांगलं वाटावं म्हणून हे त्यांच्याच फेवर मधल्या बातम्या लावतात. आणि आपल्या गॉडफादरला खुश करण्यासाठी काही येडझवे पहलगाम सारख्या संवेदनशील प्रकरणावर सुद्धा दुःख विचारात न घेता शेपूट हलवून त्यांचा मालक खुश होईल अशी कमेंट करीत आहेत. खरं तर अशा बेजबाबदार विधानं करणाऱ्यांना चपलेने पिटायला हवं..
सबसे तेजच्या नादात माध्यमातील काही लोक कदाचित यांच्याच सांगण्या वरून हिंदू मुस्लिम भांडणं लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचं बाहेर जाणकार बोलताना कानी येत आहे. धर्म विचारून गोळ्या घालणारे मुद्दाम हिंदू मुस्लिम समाजात द्वेष पसरवीत आहेत हे या राजकारण्यांना ठाऊक नाही काय.?? जे लोक पहलगाम वरून सुखरूप घरी परतले आहेत त्यांनी तिथल्या मुस्लिम बांधवांनी जीवाची पर्वा न करता आम्हाला सुखरूप आमच्या हॉटेलवर पोहोचवलं, आमच्या घरी चला असं ही वारंवार सांगितलं. असं हे मराठी लोक सांगत आहेत. पण मीडिया या कडे विशेष लक्ष देतांना दिसत नाही. कारण कुणाच्या तरी सांगण्यावरून पुन्हा धार्मिक द्वेषाचं राजकारण तर खेळलं जात नाही ना हेही तपासून पाहावं लागेल. कुठे ना कुठे निवडणूका आल्या की अशा घटना घडतात असेही काही लोक बिनधास्तपणे बाहेर बोलतांना आढळत आहेत. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात म्हणा.. भारतीय सैन्य टॉपक्लास आहे त्यांना पूर्णपणे मोकळीक द्या आणि मग बघा ते अतिरेकी, दहशतवादी आणि पाकिस्तानला कसं धुळीस मिळवतात ते. दुसरी गोष्ट दहशतवाद्यांनी जात विचारून गोळ्या घातल्या. खरं आहे हे. पण, हे दहशतवादी आहेत मारणे हा त्यांचा धर्म आहे. मात्र, आपल्याकडे आज माणूस अनेकदा चंद्रावर गेलेला असतांना कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष जी जातीयता जोपासली आणि पोसली जातेय त्या लोकांना तुम्ही काय बोलणार हो..?? आहे का याचं उत्तर कुणाकडे. मला सर्वात वाईट वाटतं ते सर्वसामान्य जनतेचं काही अपवाद वगळता पूर्ण शहानिशा न करता दिलेल्या सबसे तेज न्यूज पाहून हे लोक त्या बातम्यावाल्यांपेक्षा जास्त तेज या बातम्या WhatsApp आणि तत्सम माध्यमांच्या सहाय्याने तेल मीठ लावून पुढे पसरवतात. हे अगोदर थांबवायला पाहिजे.. आपण जनता म्हणून स्वतःला खूप हुशार समजतो. ए पब्लिक है सब जानती है.. असं आपण म्हणतो. पण, सगळ्यात जास्त वेडे आपणच आहोत कारण सगळे लोक येऊन आपल्याला म्हणजे सर्वसामान्य लोकांनाच फसवतात.. अजूनतरी जागे व्हा आणि सद्विवेकबुद्धी जागी ठेवून निर्णय घ्या..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2025. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.