डोंबिवली पूर्वेच्या श्री समर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रन स्कुल चा दसरा सोहळा दणक्यात संपन्न..

विद्यार्थ्यांना आपले सण आणि परंपरा यांची माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश..

डोंबिवली : सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर 2026 रोजी दसऱ्याच्या आदल्या दिवशी डोंबिवली पूर्वेच्या श्री समर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रन स्कुलच्या विद्यार्थी आणि शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दसऱ्याचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आपले सण आणि आपली परंपरा कळावी हा यामागील उद्देश असल्याच्या भावना श्री समर्थ कृपाचे सर्वेसर्वा विनोद सूर्यराव सर यांनी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केल्या.. या प्रसंगी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव सर आवर्जून उपस्थित होते.. फळ्यावर काढलेली आकड्यांची सरस्वती माता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. याप्रसंगी लॅमिनेशन करणारे यंत्र, पॅकिंगचे यंत्र, कागदी कप आणि प्लेट बनविणारे यंत्र, कांडण मशीन अशा अनेक वस्तूंची पूजा करण्यात आली. दिवाळी अगोदर  शाळा मुलांनी बनविलेल्या, विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या, आकाशकंदील , मेणबत्या, अगरबत्ती, धूप, रांगोळी इत्यादी अनेक वस्तूंचे प्रदर्शन भरविणार आहे. या सर्व वस्तू पालक तथा परिसरातील मंडळींनी खरेदी करून या शाळेला व मुलांच्या मेहनतीला आर्थिक हातभार लावावा असे आवाहन शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे संपादक प्रा. दिपक जाधव यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. विनोद सूर्यराव सर. फोन नंबर : 9158346903 

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

78
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.