ललिता पंचमीनिमित्त डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात महाआरती व भोंडला उत्साहात संपन्न..

डोंबिवली : रेल चाईल्ड शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी विद्यामंदिरात गुरुवार 15 ऑक्टोबर 2026 रोजी ललिता पंचमीनिमित्त महाआरती व भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. महाआरतीची सुरुवात शाळा समिती सदस्या माननीय सौ. सुमेधा साठे मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. त्यानंतर पालक प्रतिनिधी व शिक्षकांनी देवीची आरती करून देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर 'ऐलमा पैलमा..' या गीतावर पालक प्रतिनिधी व शिक्षिकांनी फेर धरुन पारंपरिक भोंडला साजरा केला.. यानंतर महिला पालकांना हळदी-कुंकू, चहा व अल्पोपहार देण्यात आला. सर्व पालक प्रतिनिधींच्या वतीने एका पालक प्रतिनिधीने मनोगत व्यक्त केले. 

शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. सुनील कांबळी सर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम करण्यास उत्साह भेटला. पालक प्रतिनिधी व शिक्षिकांच्या सहभागाने हा महाआरती व भोंडला सोहळा यादगार झाला.. 

- दिनकर सोमासे. विशेष प्रतिनिधी शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

40
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

shabda.khadag@gmail.com

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.