रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी डोंबिवली पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शब्द खड्ग चे संपादक प्रा. दिपक जाधव आणि शब्द खड्ग टीम ने केले होते आयोजन..
जुन्या नव्या गायक गायिकांना गाण्याची संधी मिळावी या उद्देशाने शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्राचे सर्वेसर्वा प्रा. दिपक जाधव नेहमी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. याच शिरस्त्याला जागत रविवार २९ मार्च २०२६ रोजी मनातली गाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक आणि व्यवसाय मार्गदर्शक तथा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉ. अमित दुखंडे, महात्मा गांधी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सोपान कोळी सर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई विभाग अध्यक्ष अश्विन हेमंत कुमार केळकर, कल्याण डोंबिवली शहर प्रमुख अजित पवार गट व्यंकटेश नायडू, कार्यालय प्रमुख रवींद्र शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितिन खरात, पोलीस उपनिरीक्षक विजय तायडे, निलेश माळी, सुनील पै, दिनकर सोमासे, सुनील बनसोडे, साईली बनसोडे, शिवाजी जाधव, विलास चव्हाण, लता जाधव, बाबू जाधव, सुनील कांबळी सर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते..
प्रा. दिपक जाधव सर अनेक नवीन लोकांना स्टेज उपलब्ध करून देतात असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अमित दुखंडे यांनी काढून आपण शब्द खड्ग ला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
मनातली गाणी या सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात नितिन खरात यांच्या गाण्याने झाली. कार्यक्रम उत्तरोतत रंगत गेला. या कार्यक्रमात सुनील पै, रमेश गभाले, स्वप्ना तिळगुळकर, विजय तायडे, प्रफुल्ल अंदूरकर, कल्पना बनसोडे, शशिकला कांबळे, शैलेंद्र मुणनकर, पुष्पलता सोमासे, भारती खरात, निलेश गायकवाड आणि प्रा. दिपक जाधव यांनी एकापेक्षा एक वन्समोअर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली..
या प्रसंगी शब्द खड्गच्या व्यवस्थापिका साईली बनसोडे यांनी उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू आयोजित केले होते तर शब्द खड्ग तर्फे चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती.
प्रमुख पाहुणे डॉ. अमित दुखंडे आणि नितिन खरात तथा शब्द खड्गचे संपादक आणि मनातली गाणी या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. दिपक जाधव यांच्या हस्ते या कार्यक्रमात गाणी गायलेल्या गायक कलाकारांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महात्मा गांधी शाळा, साऊंड ची व्यवस्था केलेले नवनाथ म्हात्रे, शाळेच्या शिंदे मावशी, प्रभू सोनावणे, जंगम काका, चव्हाण काका आणि त्यांची फॅमिली, मंगल तिरमारे आणि शब्द खड्ग टीम तथा मित्रपरिवाराने विशेष सहकार्य केले..
- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..
Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.
Developed By Vighnesh Technologies.