एपस्टीनला उघडं करणाऱ्या ज्युली के. ब्राउन सारखी पत्रकारिता भारतातील व्यक्तिपूजा करणाऱ्या पत्रकारांना जमेल काय..??

मायामी हेराल्ड'ची (Miami Herald) पत्रकार ज्युली के. ब्राउन यांनी २०१८ मध्ये एपस्टीनच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणाचा पर्दाफाश करणारी ३-भागांची स्फोटक मालिका प्रसिद्ध केली. त्यांनी २००८ मधील 'नॉन-प्रॉसिक्युशन ॲग्रीमेंट' उघडकीस आणले, ज्याद्वारे एपस्टीनला अल्पशा शिक्षेत वाचवण्यात आले होते. त्यांच्या धाडसी अहवालामुळे एपस्टीनला पुन्हा अटक झाली आणि या प्रकरणातील मोठ्या व्यक्तींची नावे समोर आली। 

ज्युली के. ब्राउन यांच्या तपासणीतील मुख्य माहिती:

सेफ्टी नेट (Safety Net) उघडी पाडली: एपस्टीनला २००८ मध्ये फ्लोरिडात लहान मुलींच्या शोषणाप्रकरणी कसे वाचवण्यात आले आणि त्याला केवळ वेश्याव्यवसायाचे सौम्य आरोप लावून एका अत्यंत फायदेशीर करारांतर्गत (Non-prosecution agreement) सोडण्यात आले, हे त्यांनी पुरावांसह मांडले।

बळी पडलेल्या मुलींशी थेट संवाद: ब्राउन यांनी ८० हून अधिक पीडित मुलींना शोधून त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि एपस्टीनच्या लैंगिक शोषण साम्राज्याबद्दल (Sex Trafficking Ring) भयानक माहिती गोळा केली।

प्रभावी व्यक्तींचे संरक्षण: एपस्टीनला राजकीय आणि कायदेशीर यंत्रणेतील उच्चपदस्थ लोकांनी कसा पाठिंबा दिला होता, यावर त्यांनी प्रकाश टाकला।

परिणाम: या अहवालानंतर, एपस्टीनला २०१९ मध्ये अटक करण्यात आली. तसेच, हे प्रकरण दाबणाऱ्या कामगार सचिव ॲलेक्सोसटा यांना राजीनामा द्यावा लागला आणि मुख्य साथीदार घिसलेन मॅक्सवेलला (Ghislaine Maxwell) अटक झाली। त्यांच्या या कामासाठी, ज्याचा उल्लेख त्यांनी 'Perversion of Justice' या पुस्तकातही केला आहे, त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले।

भारतातील अगदी बोटावर मोजणारे पत्रकार वगळल्यास बाकीचे सर्व सरकारच्या हातातील खेळणं झालेले आहेत. विकले गेल्याने सरकार विरोधात हे 'ब्र' सुद्धा काढू शकत नाही. इतर जग विज्ञानाकडे आणि विज्ञानावादाकडे झेपावले असतांना आपल्याकडे प्रगती सोडून अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे. भारत विश्वगुरु होणार असे खोटे सांगत जनतेला मूर्ख बनविले जात आहे. आणि जनताही बेलायक लोकांना नेता मानून स्वतःचा आणि देशाचा नाश करू लागली आहे. या देशात आता यादवी होण्याची नितांत गरज आहे. वस्तुस्थिती आपल्याला बघताच येत नसल्याने आपण पुन्हा अंधायुगाकडे निघालेले आहोत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.. ज्युली के. ब्राउन यांच्या धाडसाला सलाम.. आणि भारतातील विकल्या गेलेल्या मीडियाचा आणि एका माणसासाठी १४० कोटी लोकांना वेठीस धरणाऱ्या अंधभक्तांचा, राजकारण्यांचा जाहीर निषेध..

- प्रा. दिपक जाधव. संपादक शब्द खड्ग डिजिटल वृत्तपत्र..

107
Get In Touch

Dombivli

+91 9967872052

contact@shabdakhadag.in

Follow Us
लोकप्रिय बातम्या

Shabda Khadag © 2026. All Rights Reserved.

Developed By Vighnesh Technologies.